खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
"३९३७. कौडीकौडीसाठी फोडीताती शीर । काढूनी रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारती आरोळी धैर्यबळें ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचे ॥ ३ ॥"
.
"३९८७. देवाचिये पायी वेचू सर्व शक्ती । होतील विपत्ति ज्याज्या कांही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे माझी वाचा पुढें कांही वाव । आणी दुजे भाव बोलायाचे ॥ ॥ [त. दे. मनािे.] मनाची वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥ २ ॥ तुका ह्मणे घेईं विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥ ३ ॥"
.
"३९८८. पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्ती भय वाटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाही आइकलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भेडसाविलें [दे. भडसाचवलें.] ॥ ॥ विष्णुदासां गती नाही तरावया । [पां. ह्मणतील वांयां.] ह्मणती गेले वांयां [त. पां. कष्टत ही ॥ २ ॥ धिक्कारती मज करीतां कीर्तन । काय सांगों शीण ते काळीचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥ ४ ॥"
.
संदर्भासाठी फोटो अधिकृत प्रतीचे फोटो जोडत आहे. (आणि नवगाथेचे पण जोडत आहे)
.
आता संतांचे अभंग सुद्धा आपल्या मतलबासाठी बदलून खपवणारे हे "नवईतिहासकार " हे सर्व कशासाठी करत आहेत हे सर्व सुज्ञ जाणतात.
.
आता असा बदल करून ते पुस्तक प्रकाशित करणे याला कायद्यात काय शिक्षा आहे माहीत नाही .........परंतु मिठाच्या पाण्यात भिजवलेला पोकळ बांबू किंवा ओला फोक ........आणि त्यांचा मऊ पार्श्वभाग यांची गाठभेट होणे हेच उत्तम असं निदान मला तरी वाटतं. बाकीचं तुम्ही ठरवा.
.
.






Comments
Post a Comment