Posts

Image
  खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे , त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे. . कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत. . "३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥" . "३९३७. कौडीकौडीसाठी फोडीताती शीर । काढूनी रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारती आरोळी धैर्यबळें ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचे ॥ ३ ॥" . "३९८७. देवाचिये पायी वेचू सर्व शक्ती । होतील विपत्ति ज्याज्या कांही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे माझी वाचा पुढें कांही वाव । आणी दुजे भाव बोलायाचे ॥ ॥ [त. दे. मनािे.] मनाची वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥ २ ॥ त...
  *भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले. पण या साऱ्या धकाधकीतून आपण जो आजचा सिनेमा पाहतोय तो घडला. एखादी गोष्ट जेव्हा प्रथम घडते तेव्हा तीन शक्यता असतात १)हा बदल लोक लगेच स्वीकारतात , तो यशस्वी होतो आणि तो पायंडा पडून जातो. २)हा बदल लोक स्वीकारत नाहीत , तो अपयशी ठरतो आणि परत त्याची पुनरावृत्ती होत नाही. ३)हा बदल त्यावेळी मान्य होत नाही ,पण काही काळानंतर लोकांना त्याचं महत्व समजत आणि तो ते स्वीकारतात असे चित्रपट सृष्टी तले काही पहिले प्रसंग (संदर्भ -इंटरनेट , चित्रपट संबंधी पुस्तकं) १) *पहिला भारतीय मूक चित्रपट* , "राजा हरिश्चंद्र (१९१३)" निर्माता , दिग्दर्शक , छायाचित्रण , संकलन दादासाहेब तथा धुंडिरा...
शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच तत्काळ त्यांना त्या पद वरून बडतर्फ करून ते पद मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना दिले गेले. ३)खंडोजी खोपडे , मावळातील एक देशमुख , अफझल खानाला फितूर झाला म्हणून त्याचा उजवा हात व डावा पाय कलम करण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला आणी त्याची अंमल बजावणी तत्काळ झाली. ४).मुधोळ चे बाजी घोरपडे , शहाजी महाराजांना आदिलशाही तर्फे कपटाने कैद करण्यात यांचा हात होता. ...