Posts

Showing posts from January, 2022
  *भारतीय चित्रपटात सर्वप्रथम* आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले. पण या साऱ्या धकाधकीतून आपण जो आजचा सिनेमा पाहतोय तो घडला. एखादी गोष्ट जेव्हा प्रथम घडते तेव्हा तीन शक्यता असतात १)हा बदल लोक लगेच स्वीकारतात , तो यशस्वी होतो आणि तो पायंडा पडून जातो. २)हा बदल लोक स्वीकारत नाहीत , तो अपयशी ठरतो आणि परत त्याची पुनरावृत्ती होत नाही. ३)हा बदल त्यावेळी मान्य होत नाही ,पण काही काळानंतर लोकांना त्याचं महत्व समजत आणि तो ते स्वीकारतात असे चित्रपट सृष्टी तले काही पहिले प्रसंग (संदर्भ -इंटरनेट , चित्रपट संबंधी पुस्तकं) १) *पहिला भारतीय मूक चित्रपट* , "राजा हरिश्चंद्र (१९१३)" निर्माता , दिग्दर्शक , छायाचित्रण , संकलन दादासाहेब तथा धुंडिरा...